Showing posts with label मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर. Show all posts
Showing posts with label मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर. Show all posts

मराठ्यांच्या उत्तर दक्षिणेतील हालचाली



२ मार्च १७०० रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाविरुद्ध सुरु असलेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराचे तिसरे सत्र आरंभिले. आतापर्यंतच्या अनुभवावरून बादशहाचे आकलन झाले कि मराठ्यांचे मर्म त्यांच्या किल्ल्यांत आहे. ते जिंकून घेण्यासाठी एका प्रदीर्घ मोहिमेला सन १६९९ साली वसंतगड जिंकून सुरुवात झाली व सन १७०५ साली सहा वर्षानंतर राजमाची जिंकून याचा शेवट.

बादशहा औरंगजेबाची अखेरची किल्लेमोहीम - वाकीनखेडा

इसवी सन १७०५ च्या पूर्वार्धात मोगल बादशहा औरंगजेब याने आपली शेवटची किल्ले मोहीम हाती घेतली. ती म्हणजे उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील वाकीनखेडा हा किल्ला जिंकायची मोहीम. आपला हट्ट न सोडता तसाच पुढे रेटला की होणाऱ्या नुकसानाबरोबरच किती टिंगल होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बादशहाची ही मोहीम. 

महाराणी ताराबाईंचा कारभार

दिनांक २ मार्च १७०० (जुलिअन दिनांक). सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा स्वर्गवास झाला आणि मराठी राज्य पुन्हा एकदा राजाविना पोरके झाले. शाहू राजे मोगलांच्या कैदेत होते आणि राजाराम महाराजांचे वारस लहान होते. इसवी सन १६८२ पासून स्वराज्यावर मोगलांचे परचक्र आले होते आणि त्यास प्रतिकार करता करता आता तब्ब्ल १८ वर्षे सरली होती. या कालावधीत मराठ्यांनी अतीव पराक्रम करून महत्प्रयासाने राज्य वाचवले होते.

औरंगजेब किल्ले मोहीम भाग २

“न गर्दानद अकीक अज काविशे इल्मास रुइ खुद 

दमे शमशीर माहे ईद बाशद नामजोथारा” 

-हिरा आपल्याला कापीत आहे म्हणून अकीक (लाल रंगाचे एक रत्न) थोडेच आपले तोंड फिरवते, महत्वाकांक्षी वीरांना तलवारीचे पाते पाहिले की ईदचा चांद पाहिल्याचा आनंद होतो. (मासिरे आलमगिरी पृ. ९८)

औरंगजेबाची किल्ले मोहीम भाग १

सन १६९९ चा पावसाळा औरंगजेबाचा मुक्काम सोलापूरनजीक ब्रह्मपुरी येथे भीमा नदीच्या काठी होता. बादशाही छावणी गेले चार साडे चार वर्षे इथेच होती. औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेला आता सतरा वर्षे उलटून गेली होती. अनेक जय पराजय झाले होते, पण मोहिम यशस्वी म्हणता येईल का?

रामचंद्र पंत अमात्य

'निश्चयाचा महामेरू' असे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले आहे. या जाणत्या राजाच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या शिष्यांमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या त्यांच्या कारभाऱ्यांमध्ये देखील, राजाचा हा गुण पुरेपूर उतरला होता हे रामचंद्रपंत अमात्य यांनी केलेले कार्य अभ्यासताना आपल्याला नक्की जाणवते. 

शंकराजी नारायण पंतसचिव

एकामागोमाग एक येणारी संकटं माणसाला हतबल करतात आणि शेवटी त्याचे खच्चीकरण करतात. पण काही व्यक्ती याच संकटांना संधी समजून आपल्या युक्तीने, कष्टाने, कर्माने अश्या संकटांवर मात करतात आणि आपलं सामान्यत्व असामान्यत्वात परावर्तित करतात. संकटकाळात केलेल्या या असामान्य कर्तृत्वाचा ठसा इतिहासपटलावर पक्का उमटवतात आणि वर्षानुवर्षे नव्हे शतकानुशतके पुढील पिढयांना कायम स्फूर्ती देत राहतात.

"ममलकतमदार" संताजी घोरपडे



"सर्व काही गमवा .. परंतु गमावलेले परत मिळवण्याची ऊमेद गमावू नका" - स्वामी विवेकानंद. 

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, परकीय सत्तांशी तसेच स्वकीय विरोधकांशी झगडून, मोठ्या जिद्दीने व कष्टाने शिवरायांनी उभारलेले 'हिंदवी स्वराज्य' आता लोप पावते की काय अशी भावना सन १६८९ मध्ये सुरुवातीस केवळ परकीय शत्रूंच्या मनातच नव्हे तर स्वकीयांच्या मनात देखील उत्पन्न झाली होती. त्याला कारणेही तशीच होती. सन १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर, सन १६८२ मध्ये मोगल बादशहा औरंगजेब याने मराठेशाही नष्ट करण्याच्या सूडभावनेने, सर्व लष्करी ताकदीनिशी स्वराज्यावर आक्रमण केले. पुढची ६ वर्षे, छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात मोठे रण-कुंड पेटले होते आणि मोगल-मराठे यांच्यात अखंड युद्धे, हल्ले-प्रतिहल्ले सुरु होते.

रायगड ते जिंजी..... एक खडतर प्रवास...!

आदिलशाही व कुतुबशाही एकेका वर्षाच्या अंतराने गिळंकृत केल्यावर आलमगीर बादशाह औरंगजेबाची भूक प्रचंड वाढली होती. आता त्याच्यासमोर मराठ्यांशिवाय एकही शत्रू दख्खनेत उरला नव्हता. पूर्ण ताकदीनिशी त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली. स्वराज्य चहुबाजूने वेढले गेले होते. छत्रपती संभाजी महाराज निकराची झुंज देत होते. पण औरंग्यारूपी काळाने आपला डाव साधला.

मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर – संभाजी पर्व- एक आढावा !



जनसेवा समिती,विलेपार्ले संचालित “इतिहास कट्टा-गौरव इतिहासाचा” या ब्लॉगवर आपण दि १० मे २०१७ पासून “मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - सन १६८२ ते सन १७०७” या नावाने या कालखंडात औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली स्वराज्यात ठाण मांडून बसलेल्या बलाढ्य मोगली आक्रमकांच्या विरुद्ध मराठ्यांनी देव-देश आणि धर्म यांच्या प्रतिष्ठा आणि सन्मान यासाठी सलग पंचवीस वर्षे अप्रतिहत आणि आर-पारचा जो लढा दिला त्याचा अभ्यासपूर्ण आढावा मराठी व इंग्रजी लेखमालेतून घेत आहोत.

दक्षिणीयांचे हातून पातशाही निसटली

पुरंदरच्या तहानंतर मुघल आणि मराठे यांच्यात जवळपास चार वर्षे शांतता नांदत होती. पण इ.स. १६६९-७० च्या सुमारास औरंगजेबाच्या मनात धर्मवेडाची लाट पुन्हा उसळली आणि त्याने उत्तरेतील हिंदूंच्या श्रद्धास्थानांना हानी पोहोचवण्यास सुरुवात केली. अनेक मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदूंकडून अनेक कामे केवळ जबरदस्तीने करवण्यात येऊ लागली. निरनिराळ्या कराच्या बोज्याखाली आधीच निष्प्राण होत असतानाच हिंदूंवर जिझिया कर लादण्यात आला! पण हे सारं औरंगजेब मोठ्या गुर्मीत आणि त्याच वेळेस शांततेत करत असताना उत्तरेतील हिंदू काय करत होते? राजपूत, जाट, बुंदेले आदी सारे जण मुघलांचीच चाकरी करण्यात धन्यता मनात होते! एक केवळ शीख ते काय मुघलांना प्राणपणाने विरोध करत आले होते पण एवढ्या प्रचंड मुघलदलासमोर त्यांचा पाडाव तो काय लागावा? 

कसबा संगमेश्वर ते वढू−तुळापूर…मृत्युंजयाचा अखेरचा प्रवास!

“हे राजन, तुव तप तेज निहारके तखत त्यजो अवरंग’’ म्हणजे हे शंभूराजा तुला पाहताक्षणी तुझ्या तेजाने दिपलेल्या औरंगजेबाने आपले तक्त त्यागून तुला ताजीम देण्यासाठी आपली मान खाली झुकवली आहे’. कविकलशाचे हे उत्स्फूर्त परंतु तितकेच गंभीर शब्द कडाडले आणि मोगली छावणीवर सन्नाटा पसरला संभाजी राजांना पकडल्याच्या आनंदात जल्लोष साजरा करणारी मोगली सेना बादशाहाचा उपमर्द करणाऱ्या या काव्यपंक्ती ऐकून सुन्नच झाली होती.

सिंह जाळ्यात अडकला.....!!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दोनच वर्षात १६८२ साली आलमगीर औरंगजेब दख्खनेत उतरला. संपूर्ण दख्खन काबीज करून इस्लामची हिरवी पातला सबंध हिंदुस्थानभर फडकविण्याची त्याची मनीषा होती. शिवरायांच्या पश्चात नवे टीचभर हिंदवी स्वराज्य चटकन खिशात टाकू असा त्याचा आडाखा होता, पण मराठ्यांनी त्याचे मनसुबे सफल होऊ दिले नाहीत. पहिल्या चार वर्षात १६८२, १६८३, १६८४ व १६८५ साली त्याला म्हणावं तेवढं यश प्राप्त करता आलं नाही. मराठ्यांच्या चिवट प्रतीकारापुढे औरंगजेब हतबल झाला, म्हणून त्याने त्याचा मोर्चा दक्षिणेतील इतर दोन शियापंथीय मुस्लीम पातशाह्यांकडे वळविला. विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

‘शियांना मारणारी’ असे नामकरण केलेल्या कट्यारी स्वतःजवळ बाळगणाऱ्या बादशहा औरंगजेबाची स्वारी मार्च १६८५ मध्ये विजापूर व गोवळकॊंड्याकडे वळली. दोन्ही शिया पंथीय राज्ये जिंकून संभाजीस एकाकी पाडावे आणि मग मराठी राज्याचा घास घ्यावा अशी त्याची योजना होती. १६८२ पासून बादशहा औरंगजेब मराठी राज्य जिंकण्याची शिकस्त करीत होता. त्याने आपल्या प्रचंड सेनासमुदायाची आपल्या पुत्रांच्या तसेच विविध सेनाधिकाऱ्यांच्या हाताखाली विभागणी करून, त्यांना मराठी राज्यावर चहुबाजूनी चढाया करण्यास फर्मावले. बादशहा औरंगजेबाची ही मोगली फौज उत्तरेत नाशिक-बागलाण, जुन्नर-कल्याण-भिवण्डी पासून पुणे-शिरवळ- शिवापूर ते सातारा-कोल्हापूर अश्या विस्तृत प्रदेशातून मराठी राज्यावर चढाई करत होती.

महाराष्ट्रभूमी नव्हे रणभूमी...!


संकटे येतात तेव्हा एक एक येत नाहीत. सगळीकडून एकत्र येतात. अशी काहीशी मराठीमध्ये म्हण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकस्मिक मृत्यूमुळे अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाचा पर्वतच कोसळला होता. पण शोक करत बसण्यास येथे उसंत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांचे हिंदवी स्वराज्य मार्गस्थ झाले. त्यांच्या जागी युवराज संभाजी राजे माघ शुद्ध सप्तमी रौद्र नाम संवत्सर जानेवारी १४, १५, १६ इ. स. १६८१ (जुलियन दिनांक) या दिवशी सिंहासनाधीश्वर झाले.

छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम..!!

"घरात जैसा उंदीर तैसा महाराजांचे राज्यास सिद्दी" हे सभासदाने केलेले वर्णन असो वा राज्यास सन्निधवासी शत्रू म्हणजे केवळ उदरातील व्याधी" ही अमात्यांच्या आज्ञापत्रातील नोंद असो यातून असे समजते की जंजिरेकर सिद्द्यांचा उपद्रव मराठी राज्यास प्रथमपासूनच होत होता. उपद्रव देणाऱ्या या शेजाऱ्याचा उपराळा थांबविणे आणि त्याला कायमची अद्दल घडविणे हे संभाजीराजांचे परम-कर्तव्य झाले होते. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली या काळ्या कातळरूपी वारुळातल्या सिद्दीला ठेचण्यासाठी जंजिरा मोहीम केली. आणि चहुबाजूनी समुद्राने वेढलेल्या, तोफांच्या माऱ्यालाही थोपवून धरणाऱ्या या चिलखतात बसलेला सिद्दी संभाजीराजांना या अभेद्य कोटातून आत प्रवेशकरण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होता.

काळ आला होता पण..... छत्रपती संभाजी महाराजांची गोवा मोहीम अर्थ "व्हडले राजिक"

हिंदुस्थानात पाश्चात्य देशांतून येऊन सत्ता स्थापन करणाऱ्यांपैकी सर्वात जुने म्हणजे पोर्तुगीज. मराठी कागदपत्रांमध्ये यांचा उल्लेख फिरंगी म्हणून येतो. त्यांच्या पाठोपाठ इतर पाश्चात्य राजवटी जशा कि फ्रेंच, इंग्रज, वलंदेज (डच) या आल्या. ई.स. १४९७ च्या अखेरीस वास्को द गामा हा केप ऑफ गुडहोपला वळसा घालून पुढील वर्षी कालिकत इथे आला. त्यापुढील काही वर्षातच पोर्तुगीज व अरब यांच्यात संघर्ष होऊन भारताची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. त्यांचे समुद्रावरील वर्चस्व वादातीत होते. सतराव्या शतकाच्या मध्यास पोर्तुगीजांची सत्ता प्रामुख्याने पुढील प्रदेशात होती.

छत्रपती संभाजी महाराज आणि अकबर प्रकरण..

१६५७ हे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण घेऊन आले. याच वर्षी या दोन्ही राज्यकर्त्यांना पुत्ररत्ने प्राप्त झाली.१४ मे १६५७ (ज्युलियन) रोजी पुरंदरवर संभाजी राजे यांचा जन्म झाला आणि दिनांक ११ सप्टेंबर १६५७ (ज्युलियन) रोजी अकबर याचा जन्म झाला. योगायोग असा की हे दोघेही चौथे अपत्य होते. संभाजी राजे यांच्या आधी सईबाई यांना ३ कन्यारत्ने प्राप्त झाली होती.त्यांची नावे सखुबाई,राणूबाई,आणि अंबिकाबाई अशी होती. एकाच वर्षी जन्मास आलेल्या या दोन युवराजांमध्ये आणखी एक साम्य होते ते म्हणजे या दोघांच्या माता हे दोघेही युवराज लहान असतानाच वारल्या.

लढाई मराठ्यांच्या अस्तित्वाची, शौर्य धैर्य चातुर्याच्या परिसीमेची..!!


"आसेतु हिमाचल" अर्थात काबुल पासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण हिंदुस्थान, दक्खन आणि दक्षिण आपल्या अमलाखाली आणून त्याचे इस्लामीकरण करण्याची आणि त्यायोगे रायगडाची मराठेशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुत्बशाही नष्ट करण्याची धर्मवेडी महत्वाकांक्षा उराशी बाळगून आणि असे इस्लामीकरण करून पुण्य संपादन करण्यासाठी (मूरतसम जमीरे अकसद) दिल्लीपती, मुघल सम्राट, शहेनशहा औरंगजेब आलमगीर दिनांक २२ मार्च १६८२ (जुलिअन दिनांक) रोजी औरंगाबादला डेरेदाखल झाला आणि महाराष्ट्राच्या रंग - रणभूमीवर एका महा-रणनाट्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 

मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर – भावी संघर्षाचा ओनामा

किल्ले रायगडावर सर्वत्र आनंदी वातावरण होते. आजचा प्रसंगच तसा होता. फाल्गुन वद्य दशमी शके १६०१, १५ मार्च १६८० (ज्युलिअन दिनांक), आज छत्रपती शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र राजाराम यांचे लग्न होते. वधू होती स्वराज्याचे माजी सरनोबत कैलासवासी प्रतापराव गुजर यांची कन्या जानकी. सर्व सोहळा यथासांग पार पडला. पण महाराज आतून कुठेतरी खिन्न होते. या आनंदाच्या प्रसंगी स्वराज्याचे युवराज संभाजीराजे हजर नव्हते. ते होते दूर पन्हाळ्यावर. साडे तीन वर्षापूर्वी १६७६ च्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर राजे दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाबाहेर पडले होते. संभाजीराजेही त्यांच्या समवेत बाहेर पडले व शृंगारपूर येथे रवाना झाले होते. गृहकलह टाळण्यासाठी महाराजांनी हे पाऊल उचलले होते. तेव्हापासून संभाजीराजे रायगडावर परतले नव्हते.